दोन एकरातील 1800 केळीच्या झाडांचे नुकसान:पंचनामा, तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी
अंजनगाव बारी परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसासह गारपीटीने केळी पिकाचे अक्षरशः वाटोळे केले आहे. सर्व्हे क्र.३९९/१ मधील शेतकरी निखील श्रीकृष्ण भोपळे यांच्या शेतात तब्बल २ एकर क्षेत्रावर उभे असलेले केळी पीक नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. शेतकरी भोपळे यांच्या शेतातील २६५० केळीच्या झाडांपैकी सुमारे १६०० ते १८०० खोडांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झाले असून, प्रति…