![]()
धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणानंतर ६९ विद्यार्थ्यांना विषबाधा सदृष्य लागन झाल्याची घटना २५ जुलैला रात्री समोर आली होती. या विद्यार्थ्यांना जेवनानंतर त्रास झाल्यामुळे प्रथमदर्शनी जेवणामुळेच विद्यार्थ्यांना प्रकृतीचा त्रास झाल्याच्या निष्कर्षाप्रत यंत्रणा पोहचली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून जेवण दिले जात होते. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन धारणी पोलिसांनी सदर सेंट्रल किचनचा कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या मालकासह सहा जणांविरुद्ध २६ जुलैला उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याचवेळी आश्रमशाळेच्या अधिक्षकाला निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकासह दोघांना शो कॉज बजावण्यात आली असल्याची माहीती प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी दिली आहे. सेंट्रल किचनचा मालक विजय सदाशिव बोथरे (रा. पुणे), कुणाल उडाणे (रा. पुणे), सचिन किसन सातपुते, कुक संदीपसिंग, महेश देसाई आणि ओकारेष (सर्व रा. टेंबली) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक निलेश भागवत यांनी तक्रार दिली आहे. टिटंबा येथील आश्रमशाळेसह तालुक्यातील अन्य सात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना टेंबली येथे असलेल्या सेंट्रल किचनमधून भोजनपुरवठा केला जातो. या सेंट्रल किचनमधून दरदिवशी हजारो विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. दरम्यान या सेंट्रल किचनचा कंत्राट पुण्यातील विजय बोथरे उर्वरित,पान.४ स्थानिक स्तरावर भोजन या प्रकारानंतर रविवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके टिटंबा येथे पोहचले होते. त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी करुन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधला. यावेळी पालकांनी सेंट्रल किचन बंद करुन संबधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सेंट्रल किचनसुध्दा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर भोजन देण्यात येत आहे.
Source link
टिटंबाप्रकरणी जणांवर गुन्हा; ‘सेंट्रल किचन’ बंद:अधीक्षक निलंबित, दोघांना ‘शो कॉज’ नोटीस