- Marathi News
- National
- Rain In More Than 25 States Till August 5, Signs Of Heavy Rain For 2 Days In Vidarbha, 68 Dead In Floods, 100 Still Missing
डी. कुमार शर्मा | शिवसागरहून2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

तसे पाहिले तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा दरवर्षी महापूर आणि विध्वंस आणते, पण या वेळी परिस्थिती अधिक भयानक आहे. सर्वात वेदनादायक परिस्थिती जोरहाट, शिवसागर आणि चराईदेव जिल्ह्यांमध्ये आहे, जिथे ५०० हून अधिक गावे १९ जुलैपासून आजपर्यंत जलमय आहेत. सुमारे ७ लाख घरांमध्ये ना वीज आहे, ना पिण्याचे पाणी. सरकार रेशन आणि मदत साहित्यही मोठ्या मुश्किलीने पोहोचवू शकत आहे. जिथे पूर ओसरलेला दिसतो तिथेही जीवन थांबलेले आहे. भास्करने शिवसागर जिल्ह्यात पोहोचून परिस्थिती पाहिली. येथे ३२८ गावे आजही ३-४ फुटांपर्यंत पाण्याखाली आहेत.
आसाम राज्यात ५० वर्षांत पहिल्यांदाच इतका महापूर, ३०० गावे ३-४ फुटांपर्यंत बुडाली
नवी दिल्ली | भारतीय हवामानशास्त्र विभागाने २५ हून अधिक राज्यांत ५ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरावरील हवामान प्रणालीमुळे मान्सून पुन्हा एकदा देशभरात सक्रिय झाला आहे. विदर्भात २ दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.