Headlines

धुरंधर-2 ठरला दुसरा सर्वात मोठा भारतीय चित्रपट:चित्रपटाने बाहुबली-2 ला मागे टाकले; आता कमाईत फक्त दंगल पुढे

धुरंधर 2 जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,788.32 कोटी रुपये झाली. धुरंधर 2 ने बाहुबली 2 ला मागे टाकले, ज्याने 1,788.06 कोटी रुपये कमावले होते. आता तो फक्त दंगल (₹2070 कोटी) च्या मागे आहे. प्रदर्शनाच्या 45 व्या दिवशी भारतात ₹2.77 कोटी कमावले ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 45 व्या…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

विमा क्षेत्रात 100% एफडीआयला सरकारची मंजुरी:स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा; एलआयसीमध्ये मर्यादा 20% च राहील

केंद्र सरकारने शनिवार (२ मे) रोजी विमा क्षेत्रात १००% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. आता परदेशी गुंतवणूकदार ऑटोमॅटिक रूटद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये पूर्ण मालकी घेऊ शकतील, मात्र, LIC साठी गुंतवणुकीची मर्यादा २०% वरच कायम ठेवण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी काय आहेत अटी सरकारच्या अधिसूचनेनुसार, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक विमा अधिनियम-१९३८ च्या तरतुदींच्या अधीन…

Read More

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित…

Read More

जबलपूर क्रूझ दुर्घटना- चौथ्या दिवशी काका-पुतण्याचे मृतदेह सापडले:मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली, मृतांमध्ये ४ मुले आणि ८ महिला

जबलपूरमधील बर्गी क्रूझ अपघातात आज सकाळी 9.40 वाजता कामराज आर. यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यापूर्वी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा 8 वर्षांचा पुतण्या मयूरन याचा मृतदेह सापडला होता. तो त्रिची (तामिळनाडू) येथून आला होता. या अपघातात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता दोन मुलांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी एकाची…

Read More

स्वतंत्र राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांची महाराष्ट्रदिनी निदर्शने:सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी | अमरावती केंद्र सरकारने विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचे परिणाम विदर्भ भोगतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीने सध्या विदर्भ ग्रासलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद तीन नुसार वेगळा विदर्भ देण्यात यावा, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी येथे निदर्शने करुन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. १ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात जबरदस्तीने ढकलण्यात आला. जनतेची…

Read More

अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच…

Read More

‘जय गुरुदेव’चा जयघोष; दिव्यांनी उजळून निघाले यावली शहीद गाव:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव सोहळा, मान्यवरांची हाेती उपस्थिती‎

प्रतिनिधी | अमरावती नजिकच्या यावली शहीद येथे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यांची जन्मभूमी या गावात भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जय गुरुदेव चा निनाद आणि दिव्यांची आरास करण्यात आली. पहाटे ४ वाजता पासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा कार्यक्रम गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व संच यांच्या सादरीकरणाने साजरा झाला….

Read More

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

स्व. सोमेश्वर पुसतकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर:शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

प्रतिनिधी । अमरावती स्थानिक आझाद हिंद मंडळ, अमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाचे कार्याध्यक्ष व मनपातील विरोधी पक्षनेते विलास…

Read More