सोलापुरातील घटना, महिलेच्या दिरावर संशय, शोधासाठी पोलिस पथके रवाना:75 लाखांच्या दीड एकर जमिनीसाठीआई, मुलगी अन् मुलाचा तलवारीने खून
सोलापूर ते हैदराबाद रोडवरील बोरामणीच्या पुढे असणाऱ्या मस्के वस्तीवर शुक्रवारी रात्री तिघांचा निर्घृण खून करण्यात आला. एक महिला आणि तिच्या दोन मुलांना तलवारीचे वार करून ठार करण्यात आले. उन्हाळा असल्याने हे तिघेही शेतातील घरात गच्चीवर झोपले होते. वस्तीवर दुसरे कुणी नसल्याचा फायदा घेत तिघांवर हल्ला करण्यात आला. त्यात महिला आणि मुलगी दोघी जागीच ठार झाल्या,…