Headlines

प्रिया कपूरच्या मृत्युपत्रावर दिल्ली उच्च न्यायालयाने शंका व्यक्त केली:करिश्मा कपूरच्या मुलांचे वकील म्हणाले- 7500 कोटी मिळाल्यानंतरही मृत्युपत्र का बनवले?

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मृत्युपत्रावर “सस्पिशियस सर्कम्स्टांसेज” म्हणजेच संशयास्पद परिस्थितीची टिप्पणी केल्यानंतर, ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया कपूरच्या दाव्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेश जेठमलानी म्हणाले, “खोटे मृत्युपत्र बनवण्याची काहीच गरज नव्हती. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त लोभी होते,…

Read More

कापडसिंगीत शिवारात गांजा विक्री करणाऱ्यास अटक:2 लाख रुपये किंमतीचा 4.800 ग्राम गांजा जप्त, सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी शिवारात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला सेनगाव पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. २ ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २लाख रुपये किंमतीचा ४.८०० ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाविरुध्द पोलिसांनी कंबर कसली असून अवैध मटका, जुगार अड्यांसोबतच अवैध वाळू…

Read More

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

अमरावती जीएमसीची प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली:प्रशासनासमोर पेच, पर्यायी जागेचा विचार सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (जीएमसी) अलियाबाद येथील प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयासमोर आता जागेचा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनासमोर नव्या जागेचा पर्याय स्वीकारायचा की सध्याच्या जागेचे आरक्षण बदलून घ्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूल आणि वनखात्याचे…

Read More

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शिट्टी वाजवल्याने शाहरुख खान संतापला होता:वानखेडे वादावर माजी एसीपी म्हणाले- मला सांगण्यात आले की शाहरुख गोंधळ घालत होता

२०१२ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या वादावर तत्कालीन एसीपी इक्बाल शेख यांनी नुकतेच सांगितले की, शाहरुख खान आणि एमसीए अधिकाऱ्यांमध्ये गैरसमजातून वाद झाला, तो वाढू नये म्हणून त्यांनी अभिनेत्याला घटनास्थळावरून बाहेर घेऊन जाण्यास सांगितले होते. हे प्रकरण २०१२ च्या आयपीएल सामन्यानंतर समोर आले होते, जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवले होते. सामन्यानंतर मैदानावर शाहरुख…

Read More

अकरावी प्रवेशासाठी 3 फेऱ्या, मुलींसाठी जादा राऊंड:दहावीच्या निकालानंतर नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण, आता पसंतीक्रम

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. लवकरच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील शाळा स्तरावरील ऑनलाइन नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण तीन नियमित फेऱ्या होणार असून, मुलींसाठी एक विशेष जादा फेरी निश्चित करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागताच…

Read More

अमरावती विभागात बुलडाणा अव्वल:अमरावती जिल्हा 88.26 टक्के निकालासह पिछाडीवर

आज घोषित झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्यात ९५.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्के निकालासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवत शेवटच्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय बोर्डाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मंडळाच्या प्रभारी सचिव तथा शिक्षणाधिकारी…

Read More

यावली शहीद गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा:'जय गुरुदेव'च्या निनादात गाव दिव्यांनी उजळले

यावली शहीद (अमरावती): अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव नजीकच्या यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ‘जय गुरुदेव’च्या निनादात आणि दिव्यांच्या रोषणाईत सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजल्यापासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व त्यांच्या संचाने सादर केला….

Read More

वडिलांच्या जवळ राहण्यासाठी त्रिशालाला बॉलिवूडमध्ये यायचे होते:संजय दत्तच्या सल्ल्यानंतर अभिनय सोडला, आता मानसिक आरोग्य तज्ज्ञ बनली आहे

संजय दत्त यांची मुलगी त्रिशाला दत्त एकेकाळी बॉलिवूडमध्ये येऊ इच्छित होती. याचे कारण अभिनयाचे स्वप्न नव्हते, तर वडिलांच्या जवळ राहणे हे होते. त्रिशालाने ‘इन्साइड थॉट्स आउट लाउड’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, लहानपणी तिला वाटायचे की चित्रपटांमध्ये आल्याने ती वडिलांसोबत जास्त वेळ घालवू शकेल. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे….

Read More

गिरीष महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया समोर:25 मिनिटे ट्रॅफिकमध्ये, मुलीची काळजी ठरली कारण; टीना चौधरींनी सांगितले त्या दिवशी काय घडले?

दक्षिण मुंबईत भाजपच्या महिला मोर्चादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महिलेची ओळख अखेर पटली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव आहे २१ एप्रिल रोजी वरळीत झालेल्या या मोर्चात त्यांनी भाजप पदाधिकारी, पोलिस आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांनाही धारेवर धरले होते. सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच, टीना चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे आपली…

Read More