Headlines

हिंदू महिलांच्याच बाबतीत सिझेरियनचे प्रमाण जास्त का?:कालीचरण महाराजांचा 'डिलिव्हरी जिहाद'चा आरोप, डॉक्टरांच्या हेतूवर शंका

आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कालीचरण महाराज यांनी आता डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. “देशात ‘डिलिव्हरी जिहाद’ सुरू असून यामध्ये हिंदू डॉक्टरच आघाडीवर आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हिंदू महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण हे डॉक्टरांनी पैशांसाठी रचलेले एक मोठे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील दौंड येथे…

Read More

3 Jawans Martyred in Kanker-Narayanpur Border IED Blast

जगदलपूर1 तासापूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील कांकेर-नारायणपूर सीमेवर शनिवारी झालेल्या आयईडी स्फोटात चार जवान शहीद झाले. शनिवारी सकाळी कोरोस्कोडा जंगलात शोधमोहीम राबवत असताना जवानांना मोठा धक्का बसला. नक्षलवाद्यांनी लावलेला आयईडी निकामी करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. ही घटना छोटेबेथिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका शक्तिशाली होता की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या जवानांना सावरण्याची…

Read More

हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन:थकीत देयक तातडीने अदा करण्याची मागणी, देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे

हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीकडे असलेले सुमारे १० कोटी रुपयांचे देयक तातडीने अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी इलेक्ट्रीकल कंत्राटदारांनी शुक्रवारपासून ता. १ कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात वीज कंपनीची देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यात इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडून वीज कंपनीच्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसह रो्हित्र दुरुस्ती, वीज वाहिन्या अंथरणे, खांब…

Read More

मलायका अरोरा म्हणाली- मुलगा अरहानने लग्नाला नकार दिला:म्हटले- नातवंड विसरून जा, प्रदूषण आणि खराब वातावरणात मला मुले नको आहेत

मलायका अरोराने मुलगा अरहान खानबद्दल एक गोष्ट शेअर केली. तिने सांगितले की, अरहान म्हणाला की त्याला लग्न करायचे नाही आणि तो मुलेही प्लॅन करत नाहीये. मलायकाच्या मते, मुलाने मस्करीत म्हटले, “नातवंडांची अपेक्षा सोडून दे.” नुकत्याच टाइम्स एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत मलायका नात्यांवर आणि लग्नावर बोलत होती. ती म्हणाली की, आजची पिढी नात्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. त्यांचा…

Read More

युवक काँग्रेसतर्फे लोकशाही संवादमध्ये पाच अभियानांचे उद्घाटन:सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची गरज, ज्येष्ठ विचारवंतांचे मत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘लोकशाही संवाद’ कार्यक्रमांतर्गत पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन केले. यावेळी विचारवंतांनी हुकूमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीची पुनर्स्थापना, संविधानाचे पावित्र्य राखणे आणि तळागाळातील जनतेशी नव्याने नाते जोडण्याचा संकल्प युवक काँग्रेसने करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही पाच वैचारिक अभियाने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे,…

Read More

आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, टी-रबी शंकर यांची जागा घेतील

कॅबिनेटच्या अपॉइंटमेंट कमिटीने (ACC) रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असेल, जी 3 मे किंवा त्यानंतरपासून प्रभावी मानली जाईल. जैन सध्याचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ आज संपत आहे. रोहित जैन यापूर्वी डिसेंबर 2020 पासून आरबीआयमध्ये कार्यकारी…

Read More

लाडकी बहीण योजनेला मोठा ब्रेक:सरकारचा कडक निर्णय; 54 लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता, केवायसी न केल्याचा फटका

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आता मोठी घडामोड समोर आली आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात महिलांना वगळण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी आर्थिक मदत थांबण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा…

Read More

'राजा शिवाजी' प्रदर्शित; रितेश देशमुखने केली एक विनंती:'कृपया चित्रपट पाहताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका'

अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.70 कोटींचे बंपर ओपनिंग कलेक्शन केले आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपट बघून आलेले अनेक जण चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांच्या क्लिप्स रेकॉर्ड करून त्या सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची…

Read More

No Bond in Politics, BJP-Shiv Sena Can Fight 2029 Alone

प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व . संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा…

Read More

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More