Headlines

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार:दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अभिजीत दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,…

Read More

माढा तालुक्यातील बाधित 1034 शेतकऱ्यांची ई- केवायसी अपूर्ण:खरवडून गेलेल्या जमिनीसाठी जाहीर केलेला 3 लाखांचा निधी शासन दरबारी अडकला‎

माढा तालुक्यात सिना नदीच्या महापुराला ९ महिने उलटूनही राज्य सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या आश्वासनांवर शेतकरी आजही वाट पाहत आहेत. तालुक्यात पुराने बाधित झालेल्या २७२१ शेतकऱ्यांपैकी १६८७ शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रति हेक्टर ४७ हजार रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित १०३४…

Read More

पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी

बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. अपघातग्रस्त मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बार्शी येरमाळा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर लेखी आश्वासनानंतर…

Read More

अभिवादन:व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेचा आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली

व्यक्तिस्वातंत्र्य, मानवतेची प्रतिष्ठा यासाठी आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली होती. त्यांना सदैव प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संतकवी कबीर, महात्मा फुले तर विद्या, विनय, शील ही त्यांची दैवते होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वांवर त्यांची अचल निष्ठा होती. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा दिव्य संदेश त्यांनी दिला. समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान…

Read More

अंबाड्यातून 1.39 लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त:विक्रीसाठी आणल्याचे आले समोर, एकावर गुन्हा‎

शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची साठवणूक करून ती शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करणाऱ्या अंबाडा येथील एकावर कृषी विभाग आणि मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ८६ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, सुमारे १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई २६ जूनला सायंकाळी करण्यात आली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

Read More

नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकही जखमी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेले चारही प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत….

Read More

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!:आता मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा; फडणवीस सरकार आणणार नवा कायदा

महाराष्ट्रातील लाखो महिला शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या, पण जमिनीची मालकी नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना आता स्वतंत्र ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ पावसाळी अधिवेशनात सादर करण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करत बलात्कार:भोंदूबाबाने महिलेची केली ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केला आणि तिची ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर तो संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून, राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे…

Read More

पुण्याच्या धरणांतील पाणीसाठा 24.30 टक्क्यांवर, कपात सुरू:फायर टँकमधील 'डेड स्टॉक' वापरा, जयंत इनामदार यांची मागणी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी केली आहे. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…

Read More