Headlines

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी ‘अमृतमंथन’ ध्वजस्तंभ साकारण्यात येतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. पारंपरिक ध्वजस्तंभ या संकल्पनेला आध्यात्मिक संदर्भ देण्यात…

Read More

इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले. यामुळे कंपनीचे अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बायोमास बँक शेतकऱ्यांकडून…

Read More

पुण्यात शिवसेना (उबाठा) नेतृत्वात लवकरच फेरबदल:संजय राऊतांचे आवाहन: संघटना मजबूत करा, 'मिसिंग लिंक' जोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहर नेतृत्वात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाची खरी ताकद संघटनेत असून, ती सत्तेवर अवलंबून नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास त्यांनी दाखवला. पुण्यातील एका बैठकीत राऊत यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात संघटन मजबूत करण्याचे…

Read More

आमदार रासने यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट:ज्ञानेश्वर पालखी मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील भवानी पेठ येथील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या…

Read More

अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर:प्राचार्य मांडवकर, गव्हाळे, धोटे, देशमुख यांच्यासह 12 जणांना सन्मान

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे यावर्षीचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र दिन आणि विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी हे पुरस्कार वितरित केले जातील. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात विशेष समारंभात हे वितरण होईल. या पुरस्कारांमध्ये इंदिरा महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांचा…

Read More

गोवंश कत्तलीवर बंदी घालावी:सकल हिंदू समाजाची तहसीलदारांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन

तिवसा येथे सकल हिंदू समाजाने गोवंश कत्तलीवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी शहरातून ‘गोमाता सन्मान जनजागृती मिरवणूक’ काढण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींनाही या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले. राज्यात गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी समाजाने केली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशात गायींचे…

Read More

अमरावती विद्यापीठात पत्रकारिता परीक्षेचा गोंधळ, परीक्षा रद्द:चौथ्या सेमिस्टरला तिसऱ्याचा पेपर; आठवडाभरात पुन:परीक्षा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांना चक्क तिसऱ्या सेमिस्टरचा पेपर मिळाल्याने मंगळवारी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे सरसकट चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्याची मागणी केली, मात्र विद्यापीठाने ती अमान्य करत आठवडाभरात पुन:परीक्षा घेण्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी…

Read More

थिलोरी येथे गोठ्याला आग:नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास विकी बावनेर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. सुदैवाने, या आगीत गोधनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वेळेवर मदतीमुळे आग विझवण्यात यश आले….

Read More

परतवाडा-चिखलदरा मार्गावर अवैध सागवान जप्त:वनविभागाच्या कारवाईत दोघांना 2 दिवसांची वनकोठडी

परतवाडा-चिखलदरा मार्गावर वनविभागाच्या फिरत्या पथकाने नाकेबंदी दरम्यान अवैध सागवान वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४०/बीएल ५९५२ क्रमांकाच्या एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनात सागवानाच्या २३ चरपटांची (खांब) अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या सागवानाचे…

Read More

राजुरवाडीजवळ जंगलाला आग, वीज केंद्राजवळ पोहोचली:अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

राजुरवाडी गावाजवळच्या जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या वीज केंद्राजवळ पोहोचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवून संभाव्य धोका टाळण्यात यश आले. वनविभागाच्या कम्पार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही आग लागली. वाढत्या तापमानामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ही…

Read More