गंगापूर येथे धीरेंद्र शास्त्री, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन:दोघांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी
गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमी तालुक्यातील नागरिकांतर्फे २७ एप्रिल रोजी भरउन्हात धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये वक्त्यांनी भोंदू धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर येथील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असत्य, विकृत व भडकाऊ भाषण करून…