Headlines

गंगापूर येथे धीरेंद्र शास्त्री, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन:दोघांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची शिवप्रेमी नागरिकांची मागणी‎




गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमी तालुक्यातील नागरिकांतर्फे २७ एप्रिल रोजी भरउन्हात धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये वक्त्यांनी भोंदू धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर येथील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असत्य, विकृत व भडकाऊ भाषण करून समाजात जातीय सामुदायिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कतृत्वाचा अवमान केल्याचा आरोप करून धीरेंद्र शास्त्रीसह कार्यक्रम आयोजकावर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली.या वेळी संजय जाधव, प्रा. राम बाहेती, जितेंद्र सिरसाठ, शिवाजी बनकर, संतोष काळे, प्रीतम घनघावे, अश्विनी थोरात, सुभाष कानडे, डॉ. उद्धव काळे, सागर दळवी, राहुल वानखेडे, भारत तुपलोंढे, वाल्मीक सिरसाठ, विश्वजित चव्हाण, ज्ञानेश्वर वाघचौरे, सूर्यकांत गरड, भास्कर बनसोडे, नानाभाऊ सोनवणे, राहुल ढोले, देविदास पाठे यांच्यासह , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *