Headlines

रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी:संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत…

Read More

शबरीमला प्रकरण, न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या- व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीकडून माहिती नको:थरूर यांच्या लेखाच्या उल्लेखावर CJI म्हणाले- लेख वैयक्तिक मत आहे

केरळममधील शबरीमाला मंदिरासह धार्मिक स्थळांमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाशी संबंधित याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी सांगितले की, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून मिळालेली माहिती स्वीकारली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी ही टिप्पणी दाऊदी बोहरा समुदायाच्या वतीने हजर झालेले ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना केली होती. कौल यांनी…

Read More

मुंबईतील रस्त्यांवर 'नारी शक्ती'चा एल्गार:महिला आरक्षणातील अडथळ्यांविरोधात युवतींचा जनआक्रोश; विरोधकांना सज्जड दम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या अंमलबजावणीमध्ये विरोधकांकडून टाकल्या जाणाऱ्या अडथळ्यांच्या आणि क्षुद्र राजकारणाच्या निषेधार्थ आज मुंबईतील रस्त्यांवर युवतींनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन केले. भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात मुंबईतील…

Read More

मालेगाव 2006 स्फोटातील चौघे निर्दोष:4 स्फोट, 31 बळी… पुरावेदेण्यात एनआयएला अपयश

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना दहशतवादासह (यूएपीए) सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे 31 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या साखळी स्फोटांसाठी नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला…

Read More

वडगाव कोल्हाटीत थरार:सासूने पिस्तूल हिसकावून खिडकीबाहेर फेकल्यावर आरोपीने सुनेचा गळा चिरला, घरात शिरून महिलेने आतून कुलूप लावून केला खून

वाळूज परिसरातील एक लघुउद्योजक बुधवारी (22 एप्रिल) सकाळी देवपूजा आटोपून कारखान्यात निघून गेले आणि त्यांच्या घरात शिरलेल्या प्रेयसीने त्यांच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. झटापट होताच आरोपीने डोळ्यावर स्प्रे फवारून हा खून केला. साधना महेंद्र सोनपेठकर (38, रा. साईश्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शैला सुनील सोनार (…

Read More

इन्फोसिसचा नफा चौथ्या तिमाहीत 21% वाढला:हे ₹8,501 कोटी होते, महसूलमध्ये 13% वाढ; कंपनी गुंतवणूकदारांना 25 रुपये लाभांश देईल

आयटी कंपनी इन्फोसिसने 23 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 21% वाढून ₹8,501 कोटी झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत ₹7,033 कोटींचा नफा झाला होता. ऑपरेशन्समुळे मिळणारा महसूल सुमारे 13.38% वाढला. तो ₹46,402 कोटींवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी ₹40,925 कोटी होता. वस्तू आणि सेवा…

Read More

उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी:खासदार सुप्रिया सुळेंचे आग्रही ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली 'मातोश्री'वर भेट

राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या…

Read More

आय-पॅक रेड प्रकरण, SC म्हणाले- अशा याचिका ऐकणे धोकादायक:ईडी अधिकाऱ्यांचे वैयक्तिक अधिकार आहेत तर मुख्यमंत्री ममता यांचे नाहीत का

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात I-PAC रेड प्रकरणावर ईडीच्या याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ईडीने म्हटले की, ‘कायद्याचे राज्य’ (Rule of Law) समानतेच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. जेव्हा ‘कायद्याच्या राज्या’चे उल्लंघन होते, तेव्हा एजन्सी आणि…

Read More

जिवंत वृद्धेला मृत दाखवून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न:बाणेरमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, कुटुंबाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

पुण्याच्या बाणेर परिसरात एका जिवंत वृद्ध महिलेला सरकारी कागदपत्रांवर मृत दाखवून तिची जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबाच्या सतर्कतेमुळे हा फसवणुकीचा कट वेळेत समोर आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृणालीनी संजय निकम यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड आणि…

Read More

Rajpal Yadav Opens Up About Wife Radha; Calls Her His Strength

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी नुकतेच आपल्या खासगी आयुष्याबद्दल आणि पत्नी राधा यादवसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. राजपाल त्यांच्या पत्नीला फक्त जीवनसाथीच नाही, तर आपली सर्वात मोठी ताकद आणि ‘प्रवासाचा कणा’ मानतात. शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या सासऱ्यांनी सर्वात आधी ‘जंगल’ चित्रपटात राजपाल यांचा फोटो पाहिला होता,…

Read More