Headlines

सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप ग्रामीण भागात, विशेषतः घाटलाडकी येथे केरोसीनचा पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता केरोसीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत…

Read More

संघरत्न सरोदे अमरावती जिल्हा परिषदचे नवे शिक्षणाधिकारी:सतीश मुगल यांच्याकडून स्वीकारला पदभार, नांदेडहून बदली

अमरावती जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून संघरत्न सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी अमरावतीत पदभार स्वीकारला. सरोदे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सरोदे यांच्या पदभार स्वीकारल्यामुळे मुगल हे आता उपशिक्षणाधिकारी या त्यांच्या मूळ पदावर कायम राहतील. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे अधीक्षक पंकज गुल्हाने…

Read More

भंडाऱ्यात आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला:लग्नावरून परतताना वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ गावावर शोककळा…

Read More

22 वर्षीय भावेश वानखडेला पहिल्याच प्रयत्नात कॅगमध्ये नोकरी:प्रतिकूल परिस्थितीतून मिळवले यश, समाजकार्य महाविद्यालयाचा गौरव

मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्र सरकारच्या कॅग (कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) संस्थेत लेखाधिकारी (अकाउंटंट) पदावर यश मिळवले आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी ही महत्त्वपूर्ण नोकरी मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. भावेश यांचे वडील विटभट्टीवर काम करतात, तर आई सूतगिरणीत मजूर म्हणून कार्यरत…

Read More

मध्यप्रदेशातील ज्वारीची स्थानिकांच्या नावावर विक्री:मोर्शीतील प्रकार, खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी केली चौकशीची मागणी

मोर्शी येथे ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून आणलेली ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला विकली जात असून, त्यासाठी बोगस अर्ज भरले जात आहेत. मोर्शी तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या व्यवहारामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता संघाचे संचालक बंडू साऊत, पंकज विधळे, मंगेश…

Read More

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक:26 एप्रिलला मतदान प्रक्रिया, अमरावतीत 2 हजार 565 डॉक्टर्स बजावणार मतदानाचा हक्क

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) १८ पैकी नऊ सदस्यांच्या निवडीसाठी रविवार, २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. अमरावती जिल्ह्यात या निवडणुकीसाठी २,५६५ डॉक्टर्स मतदार असून, त्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक या निवडणुकीचे मतदार आहेत. त्यांच्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात चार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली…

Read More

मनपाच्या पीपीपी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह:खर्चात दुप्पट तफावत, माजी विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिले निवेदन; चौकशीची मागणी

पुणे मनपाच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, क्रेडिट नोटच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर रस्ते…

Read More

पुण्यातील होर्डिंग्ज धोरण भाजप घेणार मागे:आयुक्त-स्थायी समिती अध्यक्षांच्या वादानंतर पक्षाने भूमिका केली स्पष्ट

पुणे शहरातील होर्डिंग्ज धोरणावरून सुरू असलेल्या वादानंतर भाजपने हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरुवारी (दि. २३) ही माहिती दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यातील वादामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या वादादरम्यान, ‘बघून घेतो’ असा दम देण्यात आल्याची माहिती समोर…

Read More

विधान परिषद निवडणूक:उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत, पण आगामी राज्यसभेबद्दल आताच निर्णय व्हावा – विजय वडेट्टीवार

राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार असून, विधानसभेतील पक्षीय संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (ठाकरे गट) धरला आहे. मात्र, काँग्रेसने यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, “उद्धवजींच्या उमेदवारीचे स्वागत…

Read More

लिगो इंडियाच्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ:लिगो इंडियामुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळणार – डॉ. मोहंती

हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लिगो इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी व अत्याधुनिक वैज्ञानिक प्रकल्पामुळे देशाला आंतरराष्ट्री‌य पातळीवर नवी ओळख मिळणार असल्याचे प्रतिपादन अणु ऊर्जा आयोगाचे सचिव तथा परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी दुघाळा (ता. औढा नागनाथ) येथे केले. दुधाळा येथील लिगो इंडिया प्रकल्पाच्या नागरी (सिव्हिल) व पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन आज…

Read More