कात्रज हादरले!:सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; सासरा अन् दिराविरुद्ध गुन्हा दाखल
कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महिलेने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र…