Headlines

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे:भाऊसाहेब गर्जे यांचा सल्ला, डोणगावचे नाव रोशन करणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार‎



पालकांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन बीएमजी अकॅडमीचे संचालक भाऊसाहेब गर्जे यांनी केले आहे. डोणगाव (ता. गंगापूर) येथे लोकनेते साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयात मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रात शासकीय पदावर व

.

मंचावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद हिवाळे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर होते. या वेळी विचार मंचावर बीएमजी पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीचे संचालक भाऊसाहेब गर्जे, माजी मुख्याध्यापक गुंजाळ, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशीनाथ गजहंस, पोलीस पाटील भालचंद्र पाटील, बनसोडे, गोविंद गोंडे, प्रशासकीय अधिकारी किशोर सुलाने यांची विशेष उपस्थिती होती. बीएमजी अकॅडमीचे संचालक भाऊसाहेब गर्जे यांनी आपल्या मनोगत आतून अतिशय सुंदर विचार समोर बसलेल्या हजारो श्रोत्यांना दिले. तुमची खरी संपत्ती हे तुमचे मुले आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार करणे हे तुमचं कर्तव्य आहे. मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांनी निश्चितपणे टाळावा हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. सध्या प्रचंड कॉम्पिटिशन आहे. या स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला चूक करायचीच नाही हे तुम्हाला मनाशी पक्क करावे लागेल तेव्हाच तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यामुळे सर्व पालकांना त्यांनी आवाहन केले की विद्यार्थ्यांना नोकरी लागेपर्यंत मोबाईलपासून अलिप्त ठेवावे व जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे द्यावे असेही सांगितले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुंजाळ यांनी डोणगावात घडविलेल्या विद्यार्थ्यांचे देखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. बनसोडे यांनी या शाळेने नेहमी यशस्वी विद्यार्थी या महाराष्ट्राला देशाला दिलेले आहे. या वेळी डॉ. दादासाहेब गजहंस, पोलीस उपनिरीक्षक सुनील जंघाळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये कृष्णा पाटलांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

लोकनेते साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रदीप हरिश्चंद्र काळे, आदित्य बाळू बारहाते, प्रज्वल ज्ञानेश्वर बडूगे यांचा समावेश होता. माजी सरपंच संजीव सुलाने मागील अनेक वर्षांपासून ते असे प्रेरणादायी कार्यक्रम राबवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या व विविध क्षेत्रात विराजमान झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा ते सन्मान करत आलेले आहेत. सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी किशोर सुलाने यांनी मानले. दरम्यान, निर्मला गोंडे यांनी शाळेला संविधानाची प्रत भेट दिली.

या सत्कारमूर्तींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव डॉ. दादासाहेब गजहंस (प्राचार्य लोकनेते अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना), नागेश जाधव ( विशेष शिक्षक जिल्हा परिषद शाळा नारळा तालुका वैजापूर) राजू गजहंस (विधी अधिकारी) सुनील जंघाळे( पोलीस उपनिरीक्षक) अनिल नायमाने (पोलीस उपनिरीक्षक) पवनसिंग सुंदरडे (पोलीस उपनिरीक्षक) सचिन जारवाल (पोलीस उपनिरीक्षक), पवन बमणावत (पोलिस उपनिरीक्षक), ज्ञानेश्वर गवळी (पुणे शहर पोलीस), सागर बोराडे (पुणे शहर पोलीस), हनुविराज शिरसाठ (नागपूर पोलीस), गोविंद सुलाने (जलसंपदा विभाग), कृष्णा कुकलारे (मुंबई पोलीस), करण जारवाल (मुंबई पोलीस), दादासाहेब हरकळ (माध्यमिक शिक्षक), श्रंखला रत्नपारखी (छत्रपती संभाजी नगर शहर पोलीस), इत्यादी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींना यावेळी सोनेरी फेटा बांधून विचार मंचावर बसविण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *