Headlines

राहुलनगरला होमगार्डची आत्महत्या:एमआयडीसी ठाण्यात होते कार्यरत, फॅनला दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास‎




पैठण तालुक्यातील राहूलनगर (कातपूर) येथील एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय होमगार्डने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१३ मे) सकाळी उघडकीस आली. देविदास लहुराव बोर्डे (३९) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास बोर्डे हे एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांनी राहूलनगर येथील आपल्या राहत्या घरातील खोलीमध्ये सिलींग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ७ वाजता ही बाब त्यांच्या भावाच्या निदर्शनास आली. माहिती मिळताच कर्तारसिंग सिंगल व रामेश्वर पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेतली. देविदास बोर्डे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्या कारण अस्पष्ट आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *