Headlines

पिंपळगाव हरेश्वर येथे खेळ जत्रेसह गोष्टींचे वाचन:‘पोषण पंधरवडा’ उपक्रमांतर्गत मेळावा उत्साहात, प्रात्यक्षिकातून वाढवला उत्साह‎



एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पाचोरा अंतर्गत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे व प्रकल्प अधिकारी संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.

या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनंदा क्षीरसागर, श्री समर्थ गोविंद मंदिर संस्थानचे शिवानंद महाराज, शशिकांत महाराज, पुजारी मनोज साखरे, पिंपळगाव बीटच्या सुपरवायझर नंदा कोतवाल आणि जिल्हा समन्वय सुनंदा गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध स्टॉल्स आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाट्याचे सादरीकरण करण्यात आले, अंगणवाडी सेविका आणि मातांनी नाटकाच्या माध्यमातून मुलांचा मोबाईलचा वापर कमी करण्याचा संदेश दिला. पिंपळगाव हरेश्वरमधील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. कार्यक्रमाला ग्रामस्थ, आजी-आजोबा आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दैनंदिन जीवनात पारंपारिक खेळ आणि गोष्ट वाचन अत्यंत आवश्यक आहे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

विविध खेळांतून राबवले उपक्रम.. लगोरी, लंगडी, पकडापकडी, संगीत खुर्ची आणि मनोरा रचणे यांसारख्या पारंपरिक खेळांतून मुलांचा उत्साह वाढवण्यात आला. तसेच पोषण आहार प्रात्यक्षिक, मेंदूचे जाळे, मणी ओवणे आणि चित्रावरून गोष्ट सांगणे असे उपक्रम राबवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *