Headlines

राज्यामध्ये 22 संशयित परदेशी वैद्यकीय पदवीधर:सायबर यंत्रणेकडून सखोल तपासाला सुरुवात




परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या नोंदणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ऑनलाइन नोंदणी पोर्टलमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिषदेने तातडीने दखल घेतली असून, महाराष्ट्र सायबरमार्फत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका परिषदेने स्पष्ट केली आहे. परिषदेच्या अंतर्गत तपासणी आणि नोंदणी अभिलेखांच्या छाननीदरम्यान ही अनियमितता उघडकीस आली. प्राथमिक चौकशीत २२ संशयित परदेशी वैद्यकीय पदवीधर आढळून आले. यानंतर ऑनलाइन नोंदणी प्रणालीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. तसेच संबंधित व्यक्तींना मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी परिषदेसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. तपासादरम्यान महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून, पुढील तपास सुरू आहे. या तपासात परिषद संबंधित यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे. प्रणालीत छेडछाड नको वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता, कायदेशीरता आणि वैद्यकीय नोंदणीची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी मिळविणे किंवा ऑनलाइन प्रणालीमध्ये छेडछाड करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *