Headlines

करुण अंत:पुण्यात इलेक्ट्रिक हीटिंग बॅगचाशॉक लागून अभियंत्याचा मृत्यू, दोन दिवसांनंतर दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस




मानेच्या दुखण्यावर आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची इलेक्ट्रिक हीटिंग बॅग मानेखाली ठेवून झोपणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. झोपेतच हीटिंग बॅगमधून विजेचा जोरदार धक्का बसल्याने ३० वर्षीय संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला. वडगाव शेरी परिसरातील एका सोसायटीत घडलेली ही धक्कादायक घटना दोन दिवसांनंतर दुर्गंधी सुटल्याने उघडकीस आली. रोहन कुबडी (३०) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. रोहन पुण्यातील एका नामांकित माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने वडगाव शेरीतील सोमनाथनगर येथील एका इमारतीत भाड्याने फ्लॅट घेतला होता. तो तिथे एकटाच राहत होता. उशी चार्जिंगला लावून मानेखाली घेतली होती गेल्या दोन दिवसांपासून रोहनच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता आणि तो बाहेरही पडला नव्हता. गुरुवारी घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी घरमालकाला कळवले. मालकाने रोहनला वारंवार फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने चंदननगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता रोहन बेडवर मृतावस्थेत आढळला. त्याच्या मानेखाली आणि उशाजवळ इलेक्ट्रिक गरम पाण्याची पिशवी जळालेल्या अवस्थेत आढळली. विजेचा तीव्र धक्का बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *