Headlines

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागण . तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण…

Read More

बायो टेररिझम- एनआयएने 3 आरोपींविरुद्ध दाखल केले आरोपपत्र:ISशी संबंधित डॉक्टर हजारो लोकांना विष देणार होता, जैविक हल्ल्याचा कट होता

देशात ‘जैविक दहशतवादी हल्ला’ म्हणजेच बायो टेररिझमचा धोका वाढत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने आयएसआयएसशी संबंधित बायो-टेरर प्लॉटमध्ये डॉक्टरसह 3 लोकांविरुद्ध बुधवारी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोप आहे की हे लोक सार्वजनिक ठिकाणी जैविक विषारी पदार्थांद्वारे हजारो लोकांना विष देण्याचा कट रचत होते. आरोपपत्रात हैदराबादचे डॉ. सय्यद अहमद मोहिउद्दीन आणि यूपीचे आझाद व मोहम्मद…

Read More

पेपरफुटीच्या क्लाससाठी घर देणारे डाॅ. शिरुरे सीबीआयचे साक्षीदार:नीटप्रकरणी लातूरचे बालराेगतज्ज्ञ डाॅ. शिरुरेंना चौकशीसाठी घेण्यात आले होते ताब्यात

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना गुरुवारी रात्री सीबीआयचा साक्षीदार करण्यात आले. याआधी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पेपर सेटर, लातूरचा प्राध . त्याच्या जबाबावरून सीबीआयला असा संशय आला की, डॉ. शिरुरेंनी यांनी आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला असावा. प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या…

Read More

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी…

Read More