"एआय'मुळे नोकरी जाणार नाही, पण न शिकल्यास बेरोजगार व्हाल:अमेरिकेतील कॉर्पोरेट लीडर डॉ. आकाश खुराणांचा मंत्र
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कोणत्याही क्षेत्रात माणसाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. उलट तो आपली निर्णयक्षमता आणि उत्पादकता वाढवणारे एक साधन आहे. त्यामुळे एआय माणसाला हटवणार नाही, तर एआयचा हुशारीने वापर करणारा माणूस तुमची नोकरी सहज हिरावून घेईल,असा सल्ला जागतिक फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वेस्को’ (यूएसए) कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट डॉ. आकाश खुराणा यांनी दिला….