Headlines

पारा ४१ वर; रस्ते ओस, ३ दिवस उष्णतेची लाट:उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस




प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराच्या तापमानात तांत्रिकदृष्ट्या १ अंशाने घसरण झाली असली, तरी सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी ४२ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ४१ अंशांवर स्थिरावला. मात्र, असे असले तरी अति उष्णतेमुळे तीव्र उष्णतेचे चटके जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडले होते. रात्रीच्या वेळीही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले सिमेंटचे रस्ते आणि काँक्रिटीकरणामुळे उष्णता शोषली जात आहे. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते दिवसभर तापतात आणि रात्री ती उष्णता बाहेर सोडतात, ज्यामुळे रात्रीचा उकाडा वाढतोय.त्यातच झाडांची घटती संख्या आणि काचेच्या इमारतींमुळे परावर्तित होणारी उष्णता शहराला ‘भट्टी’ बनवत आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ७२ तास शहराचे तापमान ४१ ते ४२ अंशांच्या आसपास स्थिरावलेले असेल. कोरड्या वाऱ्यांमुळे (उष्ण वारे) वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे मार्केट यार्ड, सावेडी आणि कोठी परिसरात दुपारी अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती पाहायला मिळाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *