Headlines

सिव्हिल आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज:एमबीबीएस प्रवेश ऑगस्टपासून; "एलओपी''नंतर जिल्ह्याला मिळणार १०० जागा‎




प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हिल) चेहरा-मोहरा आता बदलला असून त्याचे अधिकृत नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय’ असे करण्यात आले आहे. नाव बदलल्याने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडले असले तरी, प्रत्यक्षात एमबीबीएसच्या १०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी जिल्ह्याला आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनएमसी’कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ऑगस्ट २०२६ पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ३१ मे २०२३ रोजी चोंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महाविद्यालयाचा पाया रचला गेला होता. जागांची शोधमोहीम आणि तांत्रिक अडथळे पार केल्यानंतर, अखेर जिल्हा रुग्णालयच ७ वर्षांच्या करारावर महाविद्यालयासाठी देण्याचा मार्ग मोकळा झाला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचे डॉ. अविनाश लांब यांची ‘डीन’ पदी नियुक्ती झाल्यानंतर आता २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्राची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. डीनच असणार ‘सर्वेसर्वा’ महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाल्यावर व्यवस्थापनाची सूत्रे पूर्णपणे बदलणार आहेत. सध्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ताब्यात असलेली रुग्णालयाची सूत्रे आता ‘डीन’ यांच्याकडे सोपवली जातील. रुग्णालय आणि महाविद्यालय या दोन्ही विभागांचे सर्व अधिकार डीन यांच्याकडे असल्याने व्यवस्थापनात सुसूत्रता येईल. लॅब, हॉलचे काम वेगात ^”वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी ‘एलओपी’ (परवानगी पत्र) आवश्यक असते. यासाठी जानेवारीतच दिल्लीत कागदपत्रे सादर केली आहेत. परवानगी येण्यापूर्वीच आम्ही लॅब, लेक्चर हॉल यांसारख्या पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करत आहोत. ८ एप्रिलला पदांबाबतचा जीआर आला असून, लवकरच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होईल.” -डॉ.अविनाश लांब, डीन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *