उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे:बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची गरज; सातारा परिसरात भीम जयंतीच्या निमित्ताने वैचारिक उलाढाल
सातारा परिसरातील नाथ टॉवर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वैचारिक देवाण-घेवाणीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती धनशेट्टी (शिंदे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुशीला घोडके, नाथ मल्टिस्टेट बँकेचे संचालक…