राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने कंबर कसली:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वी महत्त्वपूर्ण मागण्यांवर एकमत
राज्यात राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकामधील त्रुटींवर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत चर्चा झाली असून यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर…