कल्याण काँग्रेसच्या बैठकीत मोठा राडा:महिला नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांच्या कानशिलात लगावली; नाश्त्याच्या वादातून राडा
कल्याण काँग्रेसमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला असून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाश्त्याच्या व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान थेट मारहाणीत झाल्याने काँग्रेसच्या शिस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी सायंकाळी कल्याण…