Headlines

तरुणी, महिलांनी स्वरक्षणात सक्षम असणे ही काळाची गरज- डॉ. गोडबोले:‘हर घर दुर्गा'' अभियानांतर्गत शिवकालीन युद्धकलेचे देणार धडे‎




डाबकी रोड, रेणुका नगर येथील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत महिला व तरुणींसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराला रविवारी प्रारंभ झाला. तरुणी, महिलांनी स्वसंरक्षणामध्ये सक्षम असणे ही काळाची गरज आहे, असे मत मुख्य अतिथी डॉ. आरती गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले. केवळ शस्त्र चालवता येणे पुरेसे नसून प्रत्येकीने आपल्यामध्ये हिंमतही जोपासावी. त्यामुळे आपल्याला कोणी त्रास देण्यापूर्वी विचार करेल, असेही त्या म्हणाल्या. शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण अभियान प्रत्येक उन्हाळी सुट्टीमध्ये ‘हर घर दुर्गा’ समितीतर्फे आयोजित करण्यात येते. यंदा हे शिबिर राजेश्वर कॉन्व्हेंटमध्ये सुरू झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. आरती गोडबोले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे व शस्त्रपूजन करून झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेणुका नगर संघचालक विलास जोशी, राजेश्वर कॉन्व्हेंटचे अध्यक्ष नंदकिशोर मेहरे, गाडगेबाबा व्यायामशाळेचे अध्यक्ष राजू गोतमारे, ‘हर घर दुर्गा’ महिला प्रशिक्षिका संगीता सरोदे, तसेच ‘हर घर दुर्गा’ समितीचे मार्गदर्शक राम भिरड हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य अतिथी डॉ. आरती गोडबोले यांनी आजच्या काळात ‘हर घर दुर्गा’ अभियानाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी त्याचे महत्त्व विशद केले. प्रत्येक तरुणी ही राणी झाशीप्रमाणे युद्धकलेत निपुण झाली पाहिजे, असे त्यांनी दोन लहान गोष्टींतून सांगितले. शिबिराच्या यशस्वितेसाठी समितीचे सूरज वाडेकर, उमेश तारापुरे, तुषार गोतमारे, पंकज मिरगे परिश्रम घेत आहेत. शिबिरात ८० पेक्षा अधिक तरुणी व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हे शिबिर २४ मेपर्यंत आहे. आत्मसंरक्षणाची भावना होणार जागृत : महिलांमध्ये आत्मसंरक्षणाची भावना जागृत व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी. या उद्देशाने ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वसंरक्षण हेच खरे सशक्तीकरण: कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. महिलांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे अतिथींनी सांगितले. स्वसंरक्षण हेच खरे सशक्तीकरण, असा संदेश शिबिरांतून देण्यात आला. शिबिरात सहभागी तरुणींनी प्रशिक्षणातून आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *