Headlines

टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीगणेशा:आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जागर; 29 रोजी समारोप‎

जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, २९ जुलै (आषाढ शुद्ध पौर्णिमा) रोजी होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड…

Read More

रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र; म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथली:नगराध्यक्षांच्या केबिनमधून हटवला तटकरेंचा फोटो

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर भगवा फडकवला. गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत आता सत्तांतर झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा…

Read More

गौडगाव येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव शिबिर:गरोदर माता, त्वचेचा आजार, महिलांची शुगर व कॅन्सर अशा विविध तपासण्या‎

गौडगाव (ता. बार्शी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहीम अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर सोमवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये ४३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १९ गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता, तसेच सरहद्दीवर असलेल्या गावांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेतला….

Read More

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप:पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार्किंगवरून वाद, सीसीटीव्ही फुटेज समोर

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रवेशद्वारावर पार्किंगच्या कारणावरून माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या वादाचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात स्वतः निवृत्त पोलीस अधिकारी यांनीच पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्याने नेमके काय…

Read More

साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा: म. भा. चव्हाण:आदिश जैन फाउंडेशनच्या हास्यकविता महोत्सवात बंडा जोशींच्या सादरीकरणाला दाद

पुण्यातील आदिश जैन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हास्यकविता महोत्सवात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी ‘साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा’ असे मत व्यक्त केले. या महोत्सवात हास्यकवी बंडा जोशी यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. म. भा. चव्हाण म्हणाले की, ज्येष्ठांनी शिकणे थांबवल्यास त्यांना भवितव्य नाही. जगण्यात अस्सलियत असेल तर गझलेत गझलियत आपोआप येते. हास्यातून…

Read More

भरत एन्काउंटर: पहिली गोळी झाडणारा STF जवान अटक:बिहार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर 6 दिवसांनी कारवाई; आत्मसमर्पणानंतर 5 गोळ्या झाडल्याचा आरोप

बिहारमधील भोजपूर येथील भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या बिहार एसटीएफ जवान अक्षय कुमारला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. भरत तिवारीचा एन्काउंटर १७ जून रोजी झाला होता. त्याची आई आशा देवी यांनी अक्षय कुमारवर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे….

Read More

हा घोटाळा नाही, प्रभू रामाच्या नावावर टाकलेला सरळ दरोडा:राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात नागपूर शहर काँग्रेसचे 'रामनाम' आंदोलन

नागपूर शहर काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात अनोखे आंदोलन केले. नेहमीच्या राजकीय घोषणांऐवजी, कार्यकर्त्यांनी पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर टाळ-मृदंगाच्या गजरात रामनामाचा जयघोष करत निषेध नोंदवला. या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या कथित चोरी आणि दरोड्याचा निषेध करण्यासाठी हा मार्ग निवडला. यावेळी आंदोलकांनी रामाचा जयजयकार करत केंद्र सरकारचा…

Read More

Rajnath Singh Chairs NEET Exam Security Meet; Army, IAF Aid Decision

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET-UC पेपरफुटीच्या वादामुळे २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेपूर्वी गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) चे महासंचालक अभिषेक सिंह उपस्थित होते. प्रधान यांनी यूपीएससीप्रमाणे नीट परीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत मागितली….

Read More

लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश

मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकार आणि गृह विभागाला या प्रकरणी जाब विचारला, तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी रोशन सुवर्णाची…

Read More

टीव्हीच्या दुनियेतून:'इन्स्पेक्टर मंजू'ने मालिका सोडली?; अखेर मोनिका राठीने सांगितले खरे कारण, डोळ्यांत लाल तिखट गेले अन्…

मालिकेतील मुख्य कलाकाराच्या तब्येतीमुळे अनेकदा कथानकात बदल करावे लागतात. मात्र, हे बदल करतानाही प्रेक्षकांचे मनोरंजन कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेने हे अगदी सहज साध्य केले आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत आर्यनने मंजूच्या डोळ्यांत लाल तिखट टाकल्याने तिची दृष्टी गेल्याचे दाखवण्यात आले. या ट्रॅकमुळे काही दिवस…

Read More