Headlines

आमदार साहेब, एसी गाड्या सोडा,या चिखलवाटेतून प्रवास करा:तेलकुडगाव-निंबेनांदूर मार्गावर गुडघाभर चिखल; दुचाकीस्वारांचे अपघात, रुग्ण, महिला, विद्यार्थ्यांचे हाल‎

नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव ते निंबेनांदूर या महत्त्वाच्या रस्त्याची पावसाळ्यात चिखलवाट झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी आणि माती साचल्याने गुडघाभर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाह . ^नेवासेच्या ग्रामीण रस्त्यांना विकासाची ‘गती’ देणार! नेवासे विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री (ग्रामीण विकास) कमलेश पासवान…

Read More

सिल्लोड आगारात व्यवस्थापक म्हणून स्वाती बाखडे यांनी स्वीकारला पदभार:कर्मचाऱ्यांकडून सत्कार, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन‎

सिल्लोड आगाराच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळली आहे. सोमवारी स्वाती घोडे-बाखडे यांनी आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे विभागाचा वाहतूक अधीक्षक या महत्वाच्या पदाचा कारभार आहे. त्यांच्या नियुक्तीने आगारातील महिला कर्मचाऱ्यांसह संपूर्ण कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यातील एका आकस्मिक घटनेनंतर आगारातील तीन महत्वाची पदे रिक्त झाली होती. यापूर्वी वाहतूक निरीक्षक…

Read More

ममता बॅनर्जी भवानीपूर स्ट्रॉंग रूममध्ये 4 तास थांबल्या:म्हटले – कोणालाही EVM लुटू देणार नाही; EC म्हणाले- पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, EVM सुरक्षित

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मध्यरात्री 1 वाजता सांगितले, ‘जर EVM लुटण्याचा आणि मतमोजणीत फेरफार करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू.’ त्या भवानीपूर येथील शेखावत मेमोरियल स्कूलमधील स्ट्रॉंग रूममध्ये 4 तासांपेक्षा जास्त काळ थांबल्या. खरं तर, टीएमसीने आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत….

Read More

Latur Teacher Vaibhav Kulkarni Wins National Teacher Award 2026

लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. शालेय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शिक्षक सक्षमीकरण आणि डिजिटल शैक्षणिक . वैभव कुलकर्णी यांना अध्यापन क्षेत्राचा तीन दशकांहून अधिक काळ समृद्ध अनुभव असून, त्यांनी दमन, तुळजापूर आणि सोलापूर येथील जवाहर नवोदय…

Read More

भंडारा-गोंदियात राजकीय ट्विस्ट!:भाजपच्या गोटात काँग्रेसचे 'प्लांटेड' नगरसेवक? पटोलेंनी हेरगिरीसाठी पाठवल्याची काँग्रेस जिल्हा महासचिवाची चर्चा

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लाखांदूर नगरपंचायतीच्या चार काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, हा पक्षांतर नसून महायुतीच्या गोटात हेरगिरी करण्यासाठी नाना पटोले यांनी खेळलेली ‘स्मार्ट मूव्ह’ असल्याचा दावा काँग्रेसच्या एका जिल्हा महासचिवाने केला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या…

Read More

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला स्वायत्ततेची शक्यता- डाॅ. सापळे:अहिल्यानगर, वर्धा, पालघरला नवीन वैद्यकीय महाविद्यालये

राज्यात सध्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणांतर्गत आगामी काळात वर्धा, पालघर आणि अहिल्यानगर येथे आणखी ३ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात पदव्युत्तर (पीजी) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तब्बल १४७० जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. येथील घाटी…

Read More

पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का; मृत संगीता चांदगुडेंच्या बहिणीचा दावा:जमिनीच्या वाटणीवरून भाऊजींनीच घरच्यांशी 20 वर्षे ठेवला दुरावा

खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेत आता एक नवीन बाजू समोर आली आहे. मृत संगीता चांदगुडे यांनीच पती मुरलीधर यांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर केले, असा आरोप होत असताना संगीता यांची बहीण पल्लवी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘दिव्य मराठी’ शी संवाद साधताना पल्लवी यांनी या कुटुंबाचा गेल्या 23…

Read More

पीएमआरडीएने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांचा केला सत्कार:वडकी नाला, कदमवाकवस्ती येथे वारकऱ्यांसाठी फराळ, पाण्याची व्यवस्था

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सासवड रस्त्यावरील वडकी नाला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे हे स्वागत करण्यात आले. पीएमआरडीएने वारीतील दिंडीप्रमुखांचा सत्कार केला, तसेच वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाचे वाटप केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त…

Read More

पोलिस भरतीची तयारी; युवकावर चाकूहल्ला:करमाड एमआयडीसीत घटना, मोबाइल पळविला‎

पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून मोबाइल लुटल्याची घटना करमाड एमआयडीसी परिसरात गुरुवारी (१४ मे) सायंकाळी पावणेआठ वाजता घडली. प्रमोद साहेबराव निकाळजे (१९, रा. रेल्वे स्टेशन परिसर, करमाड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रमोद हा पोलिस भरतीची तयारी करत असून, तो दररोज करमाड एमआयडीसी परिसरात धावण्याचा सराव करीत होता….

Read More

राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर:महाबलीपुरममध्ये 74 जिल्हाध्यक्षांसोबत पक्ष संघटनेची बैठक घेणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे पक्षाच्या संघटनेची मोठी बैठक घेणार आहेत. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या या बैठकीत ते राज्यातील 74 जिल्हाध्यक्षांशी चर्चा करतील. यासोबतच, सादरीकरणाद्वारे जिल्हाध्यक्षांना संबोधित करतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रोडमॅप तयार करतील. बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना अधिक प्रभावीपणे जोडणे हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे….

Read More