![]()
एक ऑगस्टपासून मागील दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात व लोणावळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे खडकवासला पानशेत, मुळशी, डिंबे, आंध्रा, चासकमान, भामा आसखेडा व इतर सहा धरणांतून मोठ्या विसर्गाने पाणी सोडण्यात आल्यामुळे दौंडमधून ४४,३२२ क्यूसेक विसर्
.
प्रतिनिधी | पंढरपूर गेल्या दोन दिवसांपासून भीमा नदीला निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात असून, सोमवारी भीमा नदीचा पूर ओसरला आहे. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर तालुक्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पूरस्थितीची चिंता कमी होतानाच पावसामुळे शेतकऱ्यांत उल्हासाचे वातावरण दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले असताना पंढरपूर तालुक्यात सरासरीहून खूपच कमी पाऊस झालेला आहे. तालुक्यातील नदीकाठची पिके गेल्या दोन महिन्यात विजेअभावी जळून गेली. त्यातूनही वाचलेली पिके पुरामुळे कुजून जातात की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे.
प्रतिनिधी | दक्षिण सोलापूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांमधून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीला मोठा पूर आला आहे. पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमधील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने बागायत शेती पाण्याखाली गेली आहे. या पुरामुळे भीमा नदीवर बांधण्यात आलेले वडापूर, अरळी, भंडारकवठे, सादेपूर, औज, बरुर व चिंचपूर ही सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. हत्तरसंगकुडल येथील सीना- भीमा नदीच्या संगमात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. भीमा नदीच्या पुराचे पाणी सीना नदीला दाबत आहे. यामुळे येथे सीनेत उलट दिशेने पाणी चढत आहे. कोस कोरसेगाव व बंदलगी बंधाऱ्यापर्यंत हे पाणी आले आहे. भीमा नदीच्या पाणी पातळीत अचानक झालेल्या वाढीमुळे नदीकाठच्या ऊस, केळी, भाजीपाला, मका आणि फळबागांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. पुराचे पाणी वेगाने शेतात पसरत असल्याने पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील कृषी पंपांचे साहित्य, पाईपलाईन आणि इतर अवजारे बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे.
धरणांमधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पाहता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात उतरू नये. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे मंद्रुपचे अप्पर तहसीलदार विष्णू बुटे यांनी सांगितले. जून, जुलै महिने पावसाअभावी अक्षरश कोरडे गेलेले आहेत. त्यामुळे नदीकाठचा परिसर वगळता अन्य भागात मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली होती. सोमवारी दुपारनंतर तालुक्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. पंढरपूर शहरात आणि आसपासच्या परिसरात ही जोरदार सरी कोसळल्याने नागरिकात समाधान पसरले आहे. आषाढी यात्रेनंतर शहरात हवामान दूषित झालेले असताना पावसाने सर्वत्र स्वच्छता केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांतून ही समाधान व्यक्त होत आहे.