![]()
बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून धनंजय मुंडे यांनी रोखल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. मात्र, काँग्रेसच्या या शब्दप्रयोगावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. अंजली दमानियांचे सडेतोड प्रत्युत्तर काँग्रेसने वापरलेल्या शब्दांवर तीव्र आक्षेप घेत अंजली दमानिया यांनी ट्विटर एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाषेवर बोट ठेवले आहे. दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “गुंगी गुडिया? ही कोणती भाषा आहे? एखाद्या राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा वापरणे शोभते का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना तरी ही भाषा योग्य वाटते का?” यासोबतच त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांविरुद्ध नेहमीच टोकाचा लढा दिला आहे, पण सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेले हे शब्द अतिशय चुकीचे आणि अपमानजनक आहेत. मी या भाषेचा तीव्र शब्दांत निषेध करते.” नेमके प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत थेट सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला. मात्र, सुनेत्रा पवार उत्तर देण्याआधीच तिथे उपस्थित असलेले धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली आणि पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काँग्रेसची नेमकी टीका काय होती? याच व्हायरल व्हिडिओचा आधार घेत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काँग्रेसने आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवरून हा व्हिडिओ शेअर करत विचारले होते की, “धनंजय मुंडे हे बीडचे हुकूमशहा आहेत का?” तसेच सुनेत्रा पवार यांना लक्ष्य करत, “सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. हेही वाचा.. मतदार भाजपला पराभूत करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी:बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक- पृथ्वीराज चव्हाण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी तब्बल 18 हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या या पारंपरिक मतदारसंघात झालेला पराभव पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा तडा देणारा मानला जात आहे. या धक्कादायक निकालावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर ओसरला:घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
सुनेत्रा पवारांना 'गुंगी-गुडिया' म्हणणं कसली भाषा?:पृथ्वीराज चव्हाणांना हे योग्य वाटते का? अंजली दमानियांचा काँग्रेसवर हल्लाबोल