Headlines

बांकीपूरमधील पराभव म्हणजे मोदी-भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचे उदाहरण:जंतरमंतर आंदोलन अन् राम मंदिर प्रकरणामुळेच भाजपचा पराभव- संजय राऊत




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता किती घसरली याचे बांकीपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून भाजप जिंकत आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जिथून 40 हजारांच्या लीडने निवडून आले होते त्या जागेवरील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होतो, याला कारण आहे जंतरमंतरवरील आंदोलन, राम मंदिर लुट प्रकरण, नवीन यांच्या प्रचार यात्रेत हनुमानाला नाचायला लावले हे लोकांना लागले म्हणून त्यांचा पराभव झाला, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक गुन्हेगार आहेत. देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट म्हणून गुंडांची टोळच चालवत आहेत. भाजप ज्या लोकांच्या नेमणूक करत आहे त्यामुळे बांकीपूरमध्ये त्यांना फटका बसला आहे. जंतरमंतरवर झालेल्या तरुणांच्या आंदोलनाचा सुद्धा त्यांना मोठा फटका बसला आहे. अध्यक्षांची जागा निवडून आणता आली नाही संजय राऊत म्हणाले की, बिहारच्या बांकीपूर जागेवर भाजपचे नितीन नवीन व त्यांचे वडील नवीन किशोर येथून सलग नऊ वेळा जिंकले आहेत.नितीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून नितीन नवीन तिथून आमदार होत आहे त्या जागेवर भाजपला पराभूत करत प्रशांत किशोर निवडून आले. भाजपकडून मतदारांना गृहीत धरल्यामुळे लोकांचा कल कुठे आहे हे आता दिसून येत आहे. भाजपने लोकांना गृहीत धरले संजय राऊत म्हणाले की, बांकीपूरचा गड भाजप सांभाळू शकला नाही, 64 टक्के लोकांनी त्यांच्याविरोधात मतदान केले. आता लोकांनी नवीन पर्याय निवडला, आता हवा पालट होत आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा नवीन पक्षाच्या मागे लोकं गेले. प्रशांत किशोर यांनी चांगला प्रचार केला एका जागेवर लक्ष केंद्रित केले आणि जागा जिंकली. भाजपने लोकांना गृहीत धरले, कोणाला तरी उचलून मंत्री केले म्हणून हा बदल झाला. बांकीपूर सारख्या निकालामुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढत असतो. लोकं आम्हाला आता पाठिंबा देत आहे. ते जेन झी नाहीत संजय राऊत म्हणाले की, जेन झी म्हणजे जंतरमंतरवर ज्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले त्यांच्यामधील 2 हजार लोकांना बोलावत सरसंघचालक यांनी चर्चा करायला हवी. भाजप आणि संघातील नेत्यांच्या पोरं म्हणजे काही जेन झी नाही, ती बधीर झालेली पिढी आहे. शिंदे गट भाजपमध्ये गेलेलेच आहेत त्यांनी तिकडे थेट प्रवेश करायला हवा होतो. अमित शहा यांना वाटते म्हणून एकनाथ शिंदे त्यांची कंपनी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *