Headlines

40 कोटींचे कंत्राट, तरीही शहरात धुवारणीसाठी पालिकेचीच कसरत:प्रत्येकी 3 लाखाच्या दोन व्हेईकल फाऊंटन मशीनची खरेदी‎


.

महानगर पालिका प्रशासनाने कोणार्कला वर्षाला ४० कोटी रुपयांचे स्वच्छतेचे कंत्राट दिले असताना त्यात धुवारणी (फॉगिंग), फवारणीचा (स्प्रेईंग) आश्चर्यजनकपणे समावेश केला नाही. एकप्रकारे स्वच्छता कंत्राटदाराला सोयीस्कर सूट देण्यात आली. त्यामुळे आता साथरोगांवर नियंत्रणासाठी पावसाळ्याचे दोन महिने आटोपल्यानंतर खुद्द मनपा प्रशासनालाच धुवारणी, फवारणीचे काम करावे लागत आहे. यासाठी त्यांना प्रत्येकी ३ लाखाच्या दोन व्हेईकल फाऊंटन मशीनची खरेदी करावी लागली. कारण, पावसाळ्यात साथरोग, किटकजन्य आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. ते नियंत्रित राहावे म्हणून सध्या मनपाच्या स्वच्छता विभागाला यंत्रांसह मनुष्यबळ, पैसाही खर्च करावा लागत आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी कचरा, सांडपाणी, लहान नाल्या, पाणी भरलेले खड्डे, शोष खड्ड्यांमध्ये किटकनाशक व जंतूनाशकाची नियमितपणे फवारणी करावी लागते.अन्यथा साथरोग बळावतात. ^कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.सोबत तत्कालिन मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी वर्षाला जे ४० कोटींचे कंत्राट केले. त्यात फॉगिंग, स्प्रेईंगचा उल्लेख नाही. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाच्या स्वच्छता विभागाने धुवारणी सुरू केली आहे. – डॉ. अजय जाधव, वैद्यकीय स्वच्छता अधिकारी. शहरात साथरोगांचा फैलाव होऊ नये हिच अपेक्षा नागरिकांना चावा घेणाऱ्या डास, मुरकुटे, विविध किटकांचा नाश करण्यासाठी धुवारणीची आवश्यकता असते. ही दोन्हीही कामे पद्धतशीरपणे करारनाम्यातून वगळल्यामुळे नाईलाजाने मनपा प्रशासनाला ऐनवेळी हातपाय मारावे लागत आहेत. जेणेकरून शहरात साथरोगांचा फैलाव होऊ नये. तत्कालिन मनपा प्रशासनाने करारनाम्यातून धुवारणी, फवारणीसारख्या अत्यावश्यक बाबींना वगळून एकप्रकारे स्वच्छता कंत्राटदाराला दिलासा देण्याचाच प्रयत्न केला आहे. यासाठी त्याला ना अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्र किंवा पैसाही खर्च करावा लागणार नाही. अन्यथा याआधीच्या बहुतेक सर्वच शहर स्वच्छतेच्या कंत्राटांमध्ये धुवारणी, फवारणीचा समावेश होता.

कंत्राटात फॉगिंग, स्प्रेईंगचा उल्लेख नाही

फॉगिंग, स्प्रेईंगसाठी अतिरिक्त मनुष्यबळ स्वच्छता कंत्राटदार नेहमीच फॉगिंग व स्प्रेईंगच्या कामात टाळाटाळ करतात. कारण, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असते. अन् जर करा अतिरिक्त मनुष्यबळ लावायचे असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

करारनाम्यात धुवारणी, फवारणीची अटच नाही ^मनपा प्रशासनाने स्वच्छता कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यात त्यांना धुवारणी, फवारणी करण्याची अटच घातली नसल्याने त्यांना धुवारणी, फवारणीसाठी बाध्य करता येणार नाही. हे काम मनपाच्या स्वच्छता विभागालाच करायचे आहे. त्यानुसार काम सुरू झाले आहे. चेतन गावंडे, सभागृह नेते, मनपा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *