Headlines

बाल रंगभूमीवर अहिल्यादेवींचे शौर्य, पराक्रम:सायली जुमडे, नारायणदास लढ्ढा शाळा अंतिम फेरीत; युवा कलाकारांनी वेधले लक्ष‎




बालरंगभूमी परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती संस्थेच्या स्थानिक शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा कार्यक्रम हव्याप्र. मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. बाल नाट्य दिनी पार पडलेला हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवात बालकलावंतांनी अहिल्यादेवींच्या शौर्य, शैक्षणिक उपक्रम, पराक्रम व सामाजिक कार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत आणि नाटुकल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्याम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून रंगकर्मी मनोज सामदेकर, बालरंगभूमीच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष मंगेश बक्षी, तसेच परीक्षक अजित वडवेकर व निलीमाताई लोडम उपस्थित होत्या. सादरीकरणानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात परीक्षकांच्या हस्ते गुणवंत कलावंतांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल तराळ यांनी केले, तर आभार भूषण उंबरकर यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी संजीवनी पुरोहित, स्वाती तराळ, स्नेहा तराळ, अद्वैत तराळ व सतीश जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान मान्यवरांनी कौतूक केले. येत्या ९ ऑगस्टला अंतिम फेरी अहिल्यानगरला प्राथमिक फेरीतून उत्कृष्ट सादरीकरण करत एकल गटात सायली जुमडे आणि समूह गटात नारायणदास लढ्ढा हायस्कूलची निवड करण्यात आली आहे. हे विजेते आगामी ९ ऑगस्ट या क्रांती दिनी अहिल्यानगर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *