सांगोल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घेतली भेट
सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी…