केंद्रीयमंत्री डॉ. मांडवियांच्या हस्ते 'जन सेहत सेतू'चे लोकार्पण:'निरोगी भारत' संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी: डॉ. मांडविया
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ या संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाने यात योगदान देणे आवश्यक आहे. त्यांनी ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, जिथे महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून…