Headlines

फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार:बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची 2 कोटींच्या निधीची घोषणा‎

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा विकासनिधी देणार असल्याची घोषणा राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. फर्दापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार सुहास शिरसाट व राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिस मुलतानी यांची…

Read More

प्रेमप्रकरणातून वाद:प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने‎ हत्या; प्रियकरासह चार अटकेत‎, नांदेड शहरातील आसना पूल परिसरात मध्यरात्री खून‎

नांदेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरले‎आहे. पुतणीच्या प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादाचा‎शेवट थेट खुनात झाला. सांगवीजवळील आसना पूल‎परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सचिन‎यशवंत काळे (२४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाची‎विनादांड्याच्या कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या‎‎करण्यात आली. या प्रकरणातील‎‎मुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरे‎‎याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना‎‎विमानतळ पोलिस आणि स्थानिक‎‎गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासांत‎‎ताब्यात घेतले….

Read More

राज्याला पुन्हा झोडपणार:गुजरात ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई, कोकण अन् कोल्हापूरला यलो अलर्ट

राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातपासून ते थेट कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून अधिकच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

भोंदू अशोक खरातची 13.92 कोटींची रोकड, फार्महाऊस, मर्सिडीज कार जप्त:26 मेपर्यंत ईडी कोठडीत, राहाता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही जोडले

स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडी . तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा…

Read More

मराठवाडा पुन्हा हादरला:दोन दिवसांपूर्वी 3 जिल्ह्यांत धक्के बसल्यानंतर आज हिंगोलीत 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरातील जमीन अचानक हादरली. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या (भूमापक केंद्र) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. अचानक घरांचे पत्रे आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली…

Read More

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्क . गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट…

Read More

गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली:33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत

छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरात रेल्वे विभागाच्या जेसीबीने खोदकाम करताना महावितरणची भूमिगत ३३ केव्ही वीजवाहिनी तोडली. यामुळे गारखेडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मध्यरात्री अडीच वाजता हा वीजपुरवठा पूर्ववत केला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापारेषणच्या १३२ केव्ही सातारा उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्राला वीजपुरवठा होतो….

Read More

तामशी येथे खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात कोरडवाहू शेतीचे धडे:पावसाच्या खंडात जलसंधारण उपाय व अतिवृष्टीत पाणी निचऱ्यासाठी प्रात्यक्षिक‎

खतांचा संतुलित वापर या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील तामशी येथे नुकताच खरीपपूर्व शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांनी . डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून, तसेच संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने व कृषिविद्या विभागाच्या प्रमुख…

Read More

मुंबई पोलिसात 6.41 कोटींचा बोगस पगार घोटाळा:दोन लिपिक निलंबित, जुन्या सेवार्थ प्रणालीचा कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा, 5 वर गुन्हा दाखल

मुंबई पोलिस दलात कोट्यवधी रुपयांचा दरोडा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून जुन्या सेवार्थ प्रणालीच्या त्रुटींचा गैरफायदा घेतला. अस्तित्वात नसलेल्या १० बोगस पोलिसांच्या नावे पगार लाटून तब्बल ६ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात ५ तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

Read More

बिल्डरकडून 80 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल:गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केबल व्यावसायिकाला गंडा

पुण्यात एका केबल व्यावसायिकाची ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर योगेश अंबादास देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीची रक्कम तीन वर्षांत दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. चतुःश्रृंगी पोलिसांनी देशपांडे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी धायरी येथील रहिवासी विशाल अरुण होनराव (वय ४५) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी…

Read More