Headlines

अशोक खरातच्या जीवाला धोका, फाईल बंद करण्यासाठी काहीही होऊ शकतं:त्याला जेलमध्ये सुरक्षा द्या, अंजली दमानियांची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे जर पत्र आले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असे मला वाटते आहे, काल खरातने मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझे काही तरी बरे वाईट होईल असे विधान केले आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे,…

Read More

जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी

इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले….

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषद उमेदवारीचा पेच!:नीलम गोऱ्हे अन् बच्चू कडूंना पक्षांतर्गत तीव्र विरोध; नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू असल्या तरी, संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून…

Read More

भाजपच्या राज्यात 'नारीशक्ती' बाजूला:जनगणना अन् परिसीमनाचा संबंध जोडताना मुख्यमंत्र्यांची उडाली गाळण, काँग्रेसचा टोला

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षणावरून काँग्रेसवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत महिला नेत्या उपस्थित होत्या. पण महिलांचा पुळका दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या महिलांना साधे आपले मत मांडू द्यावे असेही वाटले नाही. अर्थात भाजपच्या राज्यात नारीशक्ती अशीच बाजूला राहते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना…

Read More

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….

Read More

‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली:अक्षय कुमारच्या चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ला क्लीन विंडो, अजय देवगणने मैत्री निभावली

अजय देवगण आणि अक्षय कुमारची मैत्री पुन्हा चर्चेत आहे. बातमी आहे की अजयने ‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे, जेणेकरून ‘वेलकम टू द जंगल’ ला बॉक्स ऑफिसवर क्लीन विंडो मिळू शकेल. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, आधी ‘धमाल 4’ 4 जुलै 2026 रोजी रिलीज होणार होती. आता हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये येईल….

Read More

PM Narendra Modi ministers meeting viksit bharat 2047 goal fast decisions

नवी दिल्ली37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी रात्री दिल्लीतील सेवा तीर्थ येथे केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीत सरकारच्या कामकाजावर, मंत्रालयांच्या कामगिरीवर आणि पुढील योजनांवर चर्चा करण्यात आली. सुमारे साडेचार तास चाललेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘विकसित भारत 2047’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते सरकारचे ध्येय आणि वचन आहे….

Read More

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने…

Read More

हिंगोलीत शतपावली करणाऱ्या महिलेचे गंठण पळवले अन् पुढे…:भरधाव चोरट्यांचा अपघात, पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातच ठोकल्या बेड्या

कळमनुरी येथे महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याची घटना घडली, मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने चोरटे पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 5 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील मारवाडी गल्लीभागातील संतोषी सारडा ह्या बुधवारी…

Read More

दोन पत्नींसोबत 3-3 दिवस राहणार पती:पत्नीने भाजी सुकी भाजी न केल्याने पतीने बोलावले पोलिसांना; माणसांपेक्षा वेगाने धावणारा कोळी

उत्तर प्रदेशमध्ये दोन लग्न केलेल्या एका व्यक्तीने आठवड्यातून तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बदायूंमध्ये एका व्यक्तीने पत्नीने बनवलेल्या जेवणाची तक्रार घेऊन पोलिसांपर्यंत धाव घेतली. तर, वैज्ञानिकांनी असा कोळी शोधला आहे, जो माणसांपेक्षाही वेगाने धावतो. ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला. आता ती 10 सीटर…

Read More