आंदोलन:नशिराबादजवळ पाण्याच्या साचण्यावरून नागरिक आक्रमक
नशिराबादजवळील पोलिस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या कायम असतानाही टोल वसुली निर्विघ्नपणे सुरू असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट नशिराबाद टोल नाका गाठून काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. या आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच मोफत…