Headlines

मोठा अनर्थ टळला:शरणापूर फाट्यावर बस दुभाजकावर चढली




नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी वैजापूर-संभाजीनगर प्रवासी बस अचानक शरणापूर फाटा येथे रस्त्यावरील डिव्हायडरवर चढल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने समोरील अपघात टाळण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक मारले, ज्यामुळे बस डिव्हायडरवर चढली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही क्षण घबराट पसरली होती; परंतु चालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळत वाहन सुरक्षितरीत्या जागीच थांबवले. या घटनेत बसचे किरकोळ नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या या सतर्कतेमुळे आणि धाडसी निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *