Headlines

निफाडच्या संगमेश्वर मंदिराला पुराचा वेढा:नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 49,382 क्यूसेक विसर्ग




कादवा नदीला आलेल्या पुरामुळे निफाड येथील ऐतिहासिक संगमेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला असून मंदिराचा संपर्क तुटला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा, कादवा, बाणगंगा आदी नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी ४९,३८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला असून गोदाकाठ परिसरातील अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून शेतीचेही नुकसान झाले आहे. निफाड शहरातील पक्षीमित्र दत्ता काका उगावकर यांच्या वाड्याची भिंत कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले.कादवा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने रावळस–पिंपरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नांदूर-मधमेश्वर येथील निफाड–सिन्नर मार्गावरील पूलही बंद ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *