Headlines

आध्यात्मिक:मोडनिंब येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तिभावात, पाच हजार भाविकांनी घेतले दर्शन

माढा तालुक्यातील मोडनिंब येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसभरात सुमारे पाच हजार भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या निमित्ताने माढ्याच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मंदिर समितीच्या वतीने दर्शन,…

Read More

श्रीगोंद्यात पावसाची उघडीप, पिकांच्या खुरपणीने घेतला वेग:तालुक्यातील विहीरींच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने शेतकरी वर्गात मात्र चिंता‎

तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या उघडिपीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या खुरपणीच्या कामांना वेग दिला असून सध्या शेतशिवारात मजुरांसह शेतकरी खुरपणी करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यंदाच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, कपाशी, कांदा तसेच…

Read More

काश्मीर- दहशतवाद्यांनी नाव विचारून दोन हिंदूंना गोळ्या घातल्या:दोघांचा मृत्यू; रेकी करून लक्ष्य निवडले, सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या शोधात

दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये शुक्रवारी उशिरा संध्याकाळी विटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला कुलगामपासून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या केलाम येथे झाला. मृत तरुणांची ओळख 24 वर्षीय दीपक रात्रे आणि 28…

Read More

The movement has brought to light a new language style of ‘Gen-Z’

आपल्या विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईच्या आंदोलनामुळे ‘जेन-झी’ पिढीच्या एका नव्या आणि अनोख्या भाषेची ओळख देशाला झाली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांची सरमिसळ असलेल्या या डिजिटल अन् शॉर्टकट भाषेने सर्वांचेच लक्ष . सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ही भाषा त्यांच्या रोजच्या संवादाचा अविभाज्य भाग बनली आहे. कमी शब्दांत थेट आणि प्रभावी…

Read More

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नल परब स्कूलने मिळवले घवघवीत यश:खेळाडूंनी 8 सुवर्णपदकांसह 1 रौप्य व 2 कांस्यपदकांची केली कमाई‎

पुण्यातील द बिशप्स स्कूल, कल्याणीनगर येथे २८ आणि २९ जुलै २०२६ दरम्यान पार पडलेल्या “आयसीएसई झोनल अँड स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत अहिल्यानगरच्या कर्नल परब्स् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ८ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत श्रीराम सुरवसे, वेदांत बडे, सिया आडसुरे, आराध्या…

Read More

अकोले नगरपंचायत निवडणूक:पिचडांच्या बालेकिल्ल्यात बंड यशस्वी; "कमळ विरुद्ध कमळ' लढतीत नाईकवाडींची बाजी

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपमध्येच ‘कमळ विरुद्ध कमळ’ अशी प्रतिष्ठेची लढत रंगली. माजी नगराध्यक्ष सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी आवाजी मतदानातून ११ मते मिळवत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार वैभव पिचड पुरस्कृत उमेदवार वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा ११-६ अशा पाच मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे अकोले भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली…

Read More

राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर:महाबलीपुरममध्ये 74 जिल्हाध्यक्षांसोबत पक्ष संघटनेची बैठक घेणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे पक्षाच्या संघटनेची मोठी बैठक घेणार आहेत. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या या बैठकीत ते राज्यातील 74 जिल्हाध्यक्षांशी चर्चा करतील. यासोबतच, सादरीकरणाद्वारे जिल्हाध्यक्षांना संबोधित करतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रोडमॅप तयार करतील. बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना अधिक प्रभावीपणे जोडणे हा बैठकीचा मुख्य उद्देश आहे….

Read More

शरद कोलते इंग्लिश स्कुलमध्ये निसर्गसंवर्धनाचा विद्यार्थ्यांचा संकल्प:‘एक वृक्ष एक जीवन’ मोहिमेत 25 फुलझाडांची लागवड‎‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या ‘एक वृक्ष एक जीवन’ या विशेष मोहिमेंतर्गत आज शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये उत्साहात वृक्षारोपण सोहळा पार पडला. ​या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात २५ सुवासिक व रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने गुलाब, मोगरा,…

Read More

चित्रपट फ्लॉप झाल्यावर रडत घरी गेली सोनाली सहगल:हिमांश कोहली म्हणाला- ‘यारियां’नंतर वाटले, आता सर्व संपले

चित्रपट ‘आर्य भट्ट का झिरो’ स्वतःवर विश्वास आणि स्वप्नांसाठी संघर्ष करण्याची कथा आहे. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सोनाली सहगल, हिमांश कोहली आणि दिग्दर्शक कमल चंद्रा म्हणाले की, जेव्हा लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्यांनी हार मानली नाही. सोनालीने सांगितले की, एक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती गाडीत रडत घरी गेली होती. हिमांश म्हणाला की, ‘यारियां’नंतर…

Read More

"कुठे होता?' विचारताच पत्नीला लाकडी दांड्याने केली मारहाण:राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील घटना‎

“तुम्ही कुठे गेले होते, इतके दिवस कुठे राहत होते?’ असा जाब पत्नीने विचारल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शारदा मंगेश वारे (वय २४, रा. शेरी चिखलठाण) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Read More