![]()
पुण्यातील द बिशप्स स्कूल, कल्याणीनगर येथे २८ आणि २९ जुलै २०२६ दरम्यान पार पडलेल्या “आयसीएसई झोनल अँड स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत अहिल्यानगरच्या कर्नल परब्स् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ८ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत श्रीराम सुरवसे, वेदांत बडे, सिया आडसुरे, आराध्या खंडेलवाल, अनय परदेशी, प्रद्युम्न शेळके, ईश्वरी जाधव आणि काव्या खिळे यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. तर शेख अल हमजा याने रौप्यपदक आणि वरद आवडे व अलिना पठाण यांनी कांस्यपदक पटकावले. या सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांसह अर्णव निकरड यांची आगामी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे एकूण ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, नियमित सराव आणि शाळेचे संचालक कर्नल दिलीप परब व रिकीराज परब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक उस्मान शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाच्या संस्थापक गिता परब, प्राचार्या अर्पिता रणनवरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Source link
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नल परब स्कूलने मिळवले घवघवीत यश:खेळाडूंनी 8 सुवर्णपदकांसह 1 रौप्य व 2 कांस्यपदकांची केली कमाई