![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या ‘एक वृक्ष एक जीवन’ या विशेष मोहिमेंतर्गत आज शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये उत्साहात वृक्षारोपण सोहळा पार पडला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात २५ सुवासिक व रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने गुलाब, मोगरा, जास्वंद, चाफा, झेंडू, सदाफुली आणि पारिजात अशा विविध प्रजातींच्या रोपांचा समावेश होता. केवळ झाडे लावण्यावरच न थांबता, रोपिलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची आणि ते टिकवण्याची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने अंगावर घेतली. हा संपूर्ण उपक्रम प्रा. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका निकिता गिरवले आणि पुष्पा लोंढे यांच्यासह इतर शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ‘पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे,’ असा संदेश या वेळी मार्गदर्शकांनी दिला. शाळेच्या या हरित उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये फुलझाड लावताना विद्यार्थी.
Source link
शरद कोलते इंग्लिश स्कुलमध्ये निसर्गसंवर्धनाचा विद्यार्थ्यांचा संकल्प:‘एक वृक्ष एक जीवन’ मोहिमेत 25 फुलझाडांची लागवड