Headlines

आध्यात्मिक:मोडनिंब येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तिभावात, पाच हजार भाविकांनी घेतले दर्शन




माढा तालुक्यातील मोडनिंब येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसभरात सुमारे पाच हजार भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या निमित्ताने माढ्याच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मंदिर समितीच्या वतीने दर्शन, महाप्रसाद तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसराची स्वच्छता, आकर्षक फुलांची सजावट आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला. दिवसभर तुळशी जप, तारक मंत्र, भजन, आरती आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. सायंकाळी महाआरतीनंतर मंदिर प्रदक्षिणेसह पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळा आणि महाप्रसादाने झाली सांगता महाआरती झाल्यानंतर स्वामींच्या पालखीची प्रदक्षिणा झाली. श्री स्वामी समर्थ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी सोहळ्यानंतर उपस्थित सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *