![]()
शहरातील अण्णा भाऊ साठे नगर परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २९ जुलै) रोजी पहाटे उघडकीस आली. मृत तरुणीचे नाव कीर्ती किसन शेजाळ असे असून ती आयसीआयसीआयमध्ये नोकरी करत होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे कीर्तीच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांनी आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईक बिरुदेव शेजाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिडकीची काच फोडून आत पाहिले असता कीर्ती पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबियांनी तत्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार धुमाळ करीत आहेत.
Source link
मोहोळमध्ये 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले:अण्णा भाऊ साठे नगर परिसरातील घटना