Headlines

मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल:वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावच्या कंपनीतील संतापजनक प्रकार

नाशिकच्या अशोक खरात आणि आयटी कंपन्यांमधील अत्याचार प्रकरणांची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ‘अॅस्टोमो’ कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागणाऱ्या पीडितेकडे “मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल,” अशी निर्लज्ज मागणी करत या नराधम अधिकाऱ्याने तिचा छळ केला. या प्रकरणी धरणगाव…

Read More

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू:एकाला वाचवताना दुसऱ्यानेही गमावले प्राण, बल्लाळवाडीत शोककळा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या बल्लाळवाडी येथे मंगळवारी दुपारी एक दुःखद घटना घडली. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सोहम जयसिंग नवले (वय १२ वर्षे) आणि विघ्णेश महेश पवार (वय ८ वर्षे) या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बल्लाळवाडी गावावर आणि जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास बल्लाळवाडी…

Read More

जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश, विलंबावरून अधिकाऱ्यांची कानउघडणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महसूल, वन, जलसंधारण व वित्त विभागाचे अधिकारी…

Read More

अक्षय कुमारचा हिल्स घालून 'लाल परी' गाण्यावर डान्स:महिलांना सलाम केला, म्हणाला- हे तुम्ही कसे घालता; मला तर खूप भीती वाटली

अक्षय कुमारच्या गेम शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’चा सोमवार रात्री ग्रँड फिनाले झाला. या शेवटच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारने हाय हील्स घालून डान्स केला. शोमध्ये जॅकलिनसोबत भूमी पेडणेकर आणि फराह खानही उपस्थित होत्या. शोची पाहुणी जॅकलिन फर्नांडिसच्या सांगण्यावरून अक्षय ‘लाल पारी’ गाण्यावर डान्स करताना दिसला. टास्कमध्ये हील्स घालण्याचे आव्हान दिले शोदरम्यान जॅकलिन आणि भूमीने तक्रार केली की…

Read More

राज्यपालांच्या हस्ते भारतीय विद्यापीठ संघाच्या महासभेचे उद्घाटन:डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 100 व्या शताब्दी परिषदेला सुरुवात

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे”…

Read More

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक- सर्व 15 मनपांमध्ये भाजप विजयी:अहमदाबादमध्ये पोलिस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका, 34 जिल्हा परिषदा आणि 260 तालुका पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. यामध्ये 9992 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत 6161 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 1315 तर इतरांना 592 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट 76% आहे. आम…

Read More

बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका:इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे 'पालखेडची लढाई' विषयावर व्याख्यान

इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी महाप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित न करण्याचे आवाहन केले आहे. बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व जागतिक पातळीवर अनेक योद्धे, सेनापती आणि इतिहासकारांनी वाखाणले आहे. जगातील दहा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये त्यांच्या पालखेडच्या लढाईचा समावेश असून, अनेक देशांच्या युद्धविषयक अभ्यासक्रमांत त्यांच्या लढायांचे दाखले दिले जातात, असे लडकत म्हणाले. पूना गेस्ट…

Read More

तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला:फरार आरोपीला सहा वर्षांनी बेड्या, खराडी पोलिसांची पुण्यात कारवाई

खराडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एका तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. ही घटना २०१९ मध्ये चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, सातारा)…

Read More

व्हॉट्सॲपने 9,400 हून अधिक खाती बॅन केली:कंबोडियातून भारतात डिजिटल अरेस्टचे जाळे सुरू होते; फसवणूक रोखण्यासाठी 4 नवीन फीचर

‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळा रोखण्यासाठी व्हॉट्सॲपने 9,400 हून अधिक संशयास्पद खाती बंद केली आहेत. ही कारवाई जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या 12 आठवड्यांच्या कालावधीत सरकारी एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आणि कंपनीच्या अंतर्गत तपासणीच्या आधारावर करण्यात आली आहे. ही माहिती ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायालय सध्या देशात वाढत्या डिजिटल घोटाळ्यांच्या प्रकरणांवर स्वतःहून…

Read More

छत्रपती संभाजीनगर मनपात 10 स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र:महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रम; विकासकामांमध्ये सहभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात आज नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 10 नवीन स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात…

Read More