नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारक:राष्ट्रवादी उद्योग आघाडीचा आरोप; उद्योगांना स्थलांतराची भीती
राज्य सरकारने लागू केलेले नवीन सौर ऊर्जा धोरण राज्यातील उद्योगांसाठी हानिकारक ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग आघाडीने केला आहे. ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी वीज शुल्क आणि बॅटरीची सक्ती यामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत असून, अनेक प्रकल्प दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. यामुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त…