Headlines

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More

‘जय जय विठ्ठल’च्या गजरात निवृत्तिरायांचे पंढरीकडे प्रस्थान:60 दिंड्या, हजारो वारकरी, चांदीचा भव्य रथ आणि भक्तिमय वातावरणाने त्र्यंबकनगरी दुमदुमली

आषाढी वारीला भक्तिभावाचे उधाण आले असून श्री संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी सोमवारी (२९ जून) त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’, ‘राम कृष्ण हरी’ या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात हजारो वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. यंदा 60 दिंड्यांसह हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी…

Read More

शाळांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता उपक्रमशील व्हावे:अंधानेरच्या ‘ड्रेन फॉरेस्ट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक‎

जिल्हा परिषद शाळांनी केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शाळा आणि ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमांमुळेच गावाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेल्या ड्रेन फॉरेस्ट या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मतदार पुनरनिरीक्षण कामाची प्रत्यक्ष…

Read More

माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन:नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

“माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या कायद्याची धार बोथट करणारे आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत. प्रशासनातील ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार…

Read More

Telegram Ban NEET-UG Re-Exam Challenge

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामने दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्या अंतर्गत NEET-UG री-एक्झामपूर्वी ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी सरकारकडून टेलिग्रामवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली होती. ही बंदी 22 जून 2026…

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप आ.लखानींकडे पत्नीसह तब्बल 75कोटींहून अधिकची संपत्ती:पत्नीच्या नावेही 30 कोटी 99 लाख 162 रुपयांची मालमत्ता

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९ . विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून…

Read More

अमरनाथ गुहेत 3 दिवसांत 56000 हून अधिक भाविक:हा आकडा गत वर्षीपेक्षा 18% जास्त; बेस कॅम्पमध्ये UP च्या प्रवाशाला सर्पदंश

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 3 दिवसांत 56 हजारांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 18.6% जास्त होता. 2025 मध्ये पहिल्या तीन दिवसांत 47,972 भाविक पोहोचले होते. 57 दिवस चालणारी यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली आहे. 48 किमी लांब नुनवान-पहलगाम मार्ग आणि 14 किमी लांब पण कठीण बालटाल मार्गावरून भाविकांची…

Read More

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी

अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. सूत्रांनुसार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी थेट…

Read More

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर…

Read More