Headlines

कांतारा मिमिक्री वाद:कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहचे माफीपत्र स्वीकारले, 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल

कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे. 25 एप्रिल रोजी रणवीर सिंगने प्रतिज्ञापत्रात माफीपत्राचा समावेश केला होता. तेव्हा न्यायालयाने यावर विचार करण्यासाठी वेळ…

Read More

RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस:गैरकारभाराचा ठपका; आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 ‘अ’ आणि 47 ‘अ’ अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या नोटीसमुळे सहकार वर्तुळात…

Read More

बंगाल-आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपचा विजय निश्चित:मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जातील; बिहार विजयावर म्हणाले होते – इथून बंगाल विजयाचा मार्ग तयार झाला

भाजपचे 5 पैकी 3 राज्यांमध्ये (पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी) सरकार स्थापन करणे निश्चित आहे. केरळममध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचा TVK सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मोदींनी गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी बिहारमधील विजयानंतर म्हटले…

Read More

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप:जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी ३० हजार कर्मचारी सहभागी

अमरावती | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार आणि कर्मचारी सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील बहुतांश सरकारी कार्यालये ओस पडण्याची शक्यता आहे. या संपाबाबत सरकारी-निमसरकारी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांनी सोमवारी दुपारी…

Read More

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर,…

Read More

भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा…

Read More

हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्यांचे मुडदे कधी पडणार?:अंबादास दानवेंचा सरकारला रोकड सवाल; पहलगाम भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव…

Read More

हद्दवाढ भागात अंधार; अभियंत्यांना दिला कंदील:उपाय न केल्यास आंदाेलन; वंचितचा इशारा‎

मनपा हद्दवाढ भागात विद्युत पथदिवे नसल्याने नागरिक व वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध करत अभियंत्यांना कंदील भेट दिला. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी दिला. महापालिका हद्दवाढ भागात मूलभूत सुविधांना नागरिकांनी नेहमीच उपस्थिती लावली आहे. या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता, खुले भूखंडांचा विकास…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार:ओमराजे निंबाळकर म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झाला नाही, मतदार संघात जावून लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार

पवनराजे हत्याकांड्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ओमराजे म्हणाले की, सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच…

Read More